मनसे कामगार सेना अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांच्या मागणीला यश

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण यांनी लॉकडाउन कालावधीमध्ये सुरु झालेल्या वर्क फ्रॉम होम या नवीन कामगार प्रणालीला त्रस्त झालेल्या कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच या कामगारांकरिता देखील कामाची नियमावली असावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या कडे सप्टेंबर २०२० मध्ये केली होती. 

         सद्यपरिस्थितीमध्ये केंद्र सरकारने देखील वर्क फ्रॉम होम बाबतीत ड्राफ्ट तयार केला आहे व यावरती लवकरच निर्णय होईल. त्यामुळे वर्क फ्रॉम होम मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मनोज चव्हाण यांचे आभार मानले आहे.