कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जगभरात वर्क फ्रॉम होमला या नवीन कार्यपद्धतीला बऱ्याच प्रमाणात चालना मिळाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबतचा ड्राफ्ट तयार केला असून त्यावर लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार आहे.
केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबत तयार केलेल्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे.
तसेच या ड्राफ्टमुळे आयटी सेक्टरला अनेक सवलती मिळू शकणार आहेत. कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आणि त्यांच्या संरक्षणासाठीचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने नव्या ड्राफ्टबाबत सामान्य नागरिकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत. तसेच याबाबत काही सल्ले असल्यास ते ३० दिवसांच्या आत कामगार मंत्रालयाकडे पाठवता येतील.