महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना प्रदेश कार्यकारणी बैठक संपन्न

"गाव पातळीवर सभासद नोंदणी करण्याचा संघटना कार्यकर्त्यांचा निर्धार"

पुणे : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना ही राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक काकासाहेब शिंगारे सभागृह पुणे येथे घेण्यात आली. या वेळी प्रदेश पदाधिकारी व दहा जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष, जिल्हाचिटणीस उपस्थित होते.

      प्रभू भगवान विश्वकर्मा प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन  करुन बैठकीस सुरुवात झाली. यामध्ये प्रथम शहीद जवान,कोरोना महामारीमध्ये मृत्यमुखी पडलेले कामगार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील वर्षातील संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला, प्रदेश पदाधिकारी यांनी राज्यभर प्रवास करण्याचे ठरले. संघटनेचा राज्यभर  विस्तार व वाढीसाठी सर्वानी एकजुटीने ( गाव ) हा केंद्रबिंदू मानून गावपातळीवर कामगारांची नोंदी करण्याचा निर्धार केला गेला.

       यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले, प्रदेश सरचिटणीस शरद पंडीत यांनी बैठकीतील सर्व मुद्द्यावर, सविस्तर विवेचन केले. २०२१ या वर्षातील तालुका, जिल्हा व प्रदेश स्तरावर करावयाची कार्यक्रमाची माहिती दिली. मा आप्पा यांनी मार्गदर्शन केल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.

      या बैठकीस मीना पंडीत, सचिन जाधव, राजकुमार सुतार, प्रभाकर शिंदे, केशव खरात, स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर, विठ्ठल मचे, दत्तात्रय मटाले ,जावेद भाई, ददराव तुपे, उषा जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती  होती.