नवी दिल्ली - केंद्र सरकारने लवकरच ईपीएफ (EPF) साठी मासिक वेतनाची मर्यादा वाढविण्याची शक्यता वर्तविली असून ते १५,००० रुपयांवरून २१,००० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या मासिक वेतनाची मर्यादा वाढविण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
झी हिंदुस्तानच्या अहवालानुसार या विषयावर चर्चा करण्यासाठी कामगार मंत्रालयाचे अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यात बुधवारी बैठक झाली. त्यानुसार ईपीएफच्या मासिक वेतन मर्यादेमध्ये लवकरच वाढ केली जाईल.
भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) अलीकडेच केंद्राला विनंती केली आहे की ज्यांचा मासिक पगार १५,००० रुपये आहे अशा लोकांचा पीएफ कटिंग करू नये. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) नुसार कपातीची रक्कम मासिक पगार रुपये २१,००० घेणाऱ्या व्यक्तींसाठी केली जावी.