JFE Shoji Steel India Pvt Ltd रांजणगाव येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव Midc मधील  JFE Shoji Steel India कर्मचारी संघटना व JFE Shoji Steel India Pvt Ltd यांच्या मध्ये अत्यंत आनंददायी वातावरणा मध्ये वेतन वाढ करार संपन्न झाला. संघटनेच्या वतीने अध्यक्ष अजित चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र फलके, जन-सेक्रेटरी गोवर्धन मावळे, सह - सेक्रेटरी शरद बनकर, खजिनदार जहीर अब्दुलगानी शेख , कार्यकारिणी सदस्य योगेश राजगुरू, राजेंद्र ढोरमले, युनियन सल्लागार रामचंद्र शरमाळे तर कंपनीच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्ट यामासाकी यांनी सह्या केल्या.

     सदर वेतन वाढ करार करिता श्रमिक एकता महासंघ, पुणे अध्यक्ष दिलीप पवार, सल्लागार मारुती जगदाळे, पिंपरी चिंचवड उपमहापौर केशव घोळवे, कार्याध्यक्ष संतोष कणसे, सचिव मनोज पाटील यांनी सहकार्य केले अशी माहिती संघटना अध्यक्ष, ग्राम.सदस्य निमगाव म्हाळुंगी अजित चौधरी यांनी दिली.

यामध्ये सदर करार माहे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३  अशी तीन वर्ष कालावधी करिता करण्यात आला.

तीन वर्षाकरता कामगारांना रु.१६,३८०/- पगारवाढ देण्यात आली. ती खालील 

प्रथम वर्षाकरिता -  ७,१९०/-

द्वितीय वर्षाकरिता -  ४,५९५/-

तृतीय वर्षाकरीता - ४,५९५/-

     सदर कराराची ७० % वाढ रक्कम ही बेसिकमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व फॅसिलिटी ( बस,कॅन्टीन,मेडिक्लेम, इन्शुरन्स) विनामूल्य, करार कालावधी मधील फरक, बोनस रु.१९,०००/- , मेडिक्लेम रु.५ लाख करण्यात आला.

     सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून करून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.