पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत आणि जपान यांच्यादरम्यान Specified Skilled Worker या क्षेत्रातील भागीदारीसाठीच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करायला मंजुरी देण्यात आली. अशी माहिती पीआयबी मुंबई ने दिली आहे.
तपशील:
या करारामुळे भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य आणि भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाणार आहे. या यंत्रणेद्वारे, जपानमधील १४ Specified क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी, आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषेची परीक्षा उत्तीर्ण झालेले कुशल भारतीय कामगार पाठविणे आणि स्वीकारणे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अशा कामगारांना जपान सरकारतर्फे, Specified Skilled Worker असल्याचा नवा निवासी दर्जा दिला जाईल.
अंमलबजावणीचे धोरण:
या सहकार्य कराराअंतर्गत, या कराराच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी एका संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना केली जाईल.
प्रमुख्य उपयोग:
हा करार लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढविण्यासाठी तसेच भारतातून जपानला जाणाऱ्या कामगार आणि कुशल व्यावसायिकांच्या प्रवासाला उत्तेजन देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
लाभार्थी:
परिचारकीय सेवा, इमारत स्वच्छता, वस्तू प्रक्रिया उद्योग, औद्योगिक यंत्रसामग्री उत्पादन क्षेत्र, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहितीशी संबंधित उद्योग, बांधकाम क्षेत्र, जहाजबांधणी आणि नौकासंबंधी इतर उद्योग, वाहनांची देखभाल, विमानसेवा, तात्पुरती सशुल्क निवास व्यवस्था, कृषी, मासेमारी, अन्न आणि पेय उत्पादन उद्योग तसेच अन्नविषयक सेवा उद्योग या चौदा क्षेत्रांमधील कुशल भारतीय कामगारांना जपान मध्ये या क्षेत्रांशी संबंधित अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील.