कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्या सकारात्मक भूमिकेतून कामगार पुन्हा कंपनीमध्ये रुजू

पुणे : ६ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनी व्यवस्थापन व संघटना यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेने ईव्हर इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.कंपनीत कामगारांना सेवेत रुजू करून घेण्यात आले.

      कंपनी व्यवस्थापनाने भूतकाळातील कटुता मनात न ठेवता उदात्त हेतूने अर्चना मुळीक, उमेश गव्हाणे, जालिंदर वाळके यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामध्ये कंपनी महाव्यवस्थापक विनय सिंग तसेच मिलींद आंबेकर यांची महत्वाची भूमिका तसेच संघटना बरोबरच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार व सल्लागार मारूती जगदाळे यांची यशस्वी शिष्टाई महत्वाची ठरली.