चार कामगार कोडच्या नियमांचे परीक्षण करण्यासाठी पॅनेल

संसदेच्या कामगार स्थायी समितीने या चारही कामगार संहितांच्या नियमांचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती बिझनेसलाईन ने दिली आहे.

         पॅनेलचे अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी बिझनेसलाईनला सांगितले की, वेतन संहितेच्या मसुद्याच्या नियमांच्या विरोधात नागरिक आणि संस्थांकडून अनेक निवेदने मिळाले आहेत. तसेच पूर्वीच्या संबंधित कायद्यात अनेक बदल करताना नवीन चार कामगार कोड मध्ये नियम आहेत की नाही हे पाहणे पॅनेलचे कर्तव्य आहे.

         पॅनेलने केंद्रीय कामगार मंत्रालयाला सांगितले आहे की, नवीन चारही लेबर कोडच्या नियम व कायदे यांचा अभ्यास करून हे नवीन चार लेबर कोड मूळ कायद्यांशी जुळले आहेत की नाही हे पाहावे लागेल.