औरंगाबाद : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील शिक्षकेत्तर चौकीदार, शिपाई, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया शालेय शिक्षण निर्णय दिनांक २७ मे २००८ च्या शासन निर्णयाने केली गेली.
येथील कर्मचारी हे कुशल, अर्धकुशल, अकुशल गटामध्ये अनेक वर्षा पासुन अतिशय तुटपुंज्या मानधन वरती काम करीत आहेत, तरी कामगार कायद्यानुसार किमान वेतन मिळाले पाहिजे अशी मागणी सर्व कर्मचारी करत आहेत. याबाबत शासनाला व कामगार उप आयुक्त यांना पत्र व्यवहार केला आहे अशी माहिती कर्मचारी नितीन बोर्डे यांनी दिली.