लातूर : दि. १ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक कामगार संघटनेचा तिसरा वर्धापन दिन भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनी संघटनेतर्फे ऍम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा, व कोरोना काळामध्ये हॉस्पिटल मध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जे कामगार मागील पंचवीस ते तीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मराठवाडा पाटबंधारे यांत्रिकी कामगार संघटना (इंटक) लातूरचे कार्याध्यक्ष एम.एम.जमादार व सरचिटणीस ज.रा.पोतदार व अंधश्रद्धा निर्मुलन चे कार्यकर्ते व साहित्यकार, प्रकाशजी घादगिने या कामागर नेत्यांचा शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमामध्ये सर्व नेते मंडळीना अत्यंत प्रखरपणे कामगारांवरती होणाऱ्या अन्ययाविरुद्ध लढा देण्याची गरज व त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यामध्ये एम.एम.जमादार यांनी कामगार विषयक विविध प्रश्नांना वाच्या फोडली. त्यानंतर संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष आनंद निळे यांनी खाजगी दवाखान्यातील कामगारांना किमान वेतन १९४८ अधिनियम नुसार दरमहा वेतन, पीएफ व इतर सुविधा देणे गरजेचे असून व हा कामगारांचा न्यायहक्क व अधिकार आहे असे विचार वर्धापन दिनी मांडले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनभाऊ कोळी यांनी वर्धापन दिनी आपले विचार मांडताना, जो पर्यंत सर्व खाजगी दवाखान्यातील, कामगार, कर्मचारी यांना किमान वेतन, पीएफ लागू केला जात नाही तसेच विविध सवलती मिळत नाही तो पर्यंत या संघटनेचा वैचारिक लढा चालूच राहील असे मत मांडले. त्यानंतर प्रसाद कोळी यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.