महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना ही राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवित आहे, सर्व धर्मसभाव राखण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, मकरसंक्रांती पासून रथसप्त्तमी पर्यंत राज्यात, जिल्ह्याच्याअनेक भागात तालुका स्तरावर,भाग स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, महाराष्ट्र राज्यातील संघटनेच्या प्रमुख महिला कार्यकर्त्यांचा तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम " काकासाहेब शिंगारे सभागृह" पुणे,येथे पुणे जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.
प्रदेश उपाध्यक्ष मीना पंडीत, सुवर्णा कोंढाळकर, प्रदेश सेक्रेटरी स्मिता कोरडे, पुणे जिल्हा अध्यक्ष उषा जाधव, संध्या आदावडे, सुनिता बढे, शिला आटपाळकर, मीनाक्षी बागुल, उपाध्यक्ष नेहा जंगम व मिनाझ शेख, वर्षा ताडे, वैशाली बनकर, सुजाता गुंजाळ, चिटणीस रुतुजा सोळके, गिता भिलारे, तालुका अध्यक्ष मंगल बनसोडे, याशोदा साळवे,माधवी पवार,सुकाळे या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती .