ESIC लाभार्थ्यांना १ एप्रिल पासून सर्व जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार

ESIC Beneficiaries To Get Health Services In All Districts From 1 April 2021

       कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) विमाधारकांना (Insured Persons) १ एप्रिल पासून देशातील सर्व ७३५ जिल्ह्यांमध्ये ESI योजनेंतर्गत (ESI scheme) आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या ESIC च्या विमाधारकांना आरोग्य सेवा ३८७ जिल्ह्यांत संपूर्णतः आणि १८७ जिल्ह्यांत अंशतः उपलब्ध आहेत. तसेच  १६१ जिल्हे असे आहेत कि जेथे सेवा उपलब्ध नव्हती.

      ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत १० कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे आणि ही योजना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत चालविली जाते.

     सध्या ESIC सदस्यांना आरोग्य केंद्र किंवा ESIC कार्पोरेशनचा करार असलेल्या रुग्णालयांमध्येच उपचार घेता येत होते. आता पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJAY) ईएसआयसी लाभार्थ्यांना सर्वत्र आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

      नवीन ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याकरता ईएसआयसीनं नॅशनल हेल्थ अथॉरिटीबरोबर (NHA) एक सामंजस्य करार केला असून, यामुळं ESIC लाभार्थ्यांना ABPMJAY पॅनेलच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मिळेल. यामुळे आत्ता देशातील कोणत्याही ABPMJAY रुग्णालयात ESIC कर्मचाऱ्यांना सेवा मिळेल.

      ज्यांचे मासिक उत्पन्न रुपये २१,०००/- किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कर्मचार्‍यांना ESIC चा लाभ मिळणार आहे. दिव्यांगांच्या बाबतीत उत्पन्नाची मर्यादा रुपये २५,०००/- आहे.

संबंधित बातमी :

ईएसआयसी ESIC योजना