ऑनलाईन PF पासबुक पाहण्यासाठी UAN नंबर कसा मिळवाल


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (EPFO) हे आपल्याला वेबसाईट द्वारे कामगार / कर्मचारी याचा किती PF भरला गेला आहे तसेच PF बॅलन्स पाहण्यासाठी EPF पासबुक सुविधा उपलब्ध करते. 

ऑनलाईन PF पासबुक पाहण्यासाठी प्रथम UAN नंबर माहिती असणे गरजेचे आहे. 

UAN नंबर कसा मिळवाल 

1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (EPFO) नुसार कामगार / कर्मचारी याला Universal Account Number (UAN) नंबर संबंधित नियोक्ता / कंपनी,आस्थापना मालक देत असतो. काही ठिकाणी पगार स्लिप वरती देखील UAN नंबर दिलेला असतो.

2. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन EPFO वेबसाईट द्वारे :

  • www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.

  • Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.

  • Member UAN/Online services वरती क्लिक करा.

  • Know Your UAN वरती क्लिक करा.

  • तुमचा मोबाईल नंबर टाका 

  • रजिस्टर केलेल्या मोबाईल वरती आलेला OTP सबमिट करा.

  • तुमचे नाव, जन्म दिनांक, आधार नं / पॅन नं / मेम्बर id टाका. व Show my UAN वरती क्लिक करा.