वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिन प्रा.लि. (Worldwide Oilfield Machine Pvt. Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

भोर : एम.आय.डी.सी. मधील वेळ, येथील वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. (Worldwide Oilfield Machine Pvt. Ltd)  कंपनीमध्ये २९० कायमस्वरूपी कामगार कार्यरत असुन ते भारतीय कामगार सेना या संघटनेशी संलग्नीत आहेत. भारतीय कामगार सेना व वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. कंपनी व्यवस्थापन यांच्या पुढाकाराने कामगारांच्या वेतनवाढीसाठी बोलणी चालू होती. ज्या यशस्वीरित्या पुर्ण झालेल्या असून या कराराचा लाभ हा २९० कायमस्वरूपी कामगार यांना मिळणार आहे.

    भारतीय कामगार सेना व वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. कंपनी व्यवस्थापनामधील समन्वयाने कंपनीतील कामगारांचा त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपुर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. नविन करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष वाढ रु.१५३००/- व अप्रत्यक्ष वाढ रु.२७००/- पर्यंत (रजेच्या काळातील प्रवास व वैदयकीय भत्ता वाढ, त्यातील फरक, इ.) इतकी पगारवाढ आणि विविध सवलती, भत्त्यांमध्ये वाढ देण्यात आली.

    गेल्या काही वर्षात कंपनीतील वातावरण सौहार्दपूर्ण करण्यासाठी वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांनी संयुक्तीक व सांघीक प्रयत्न केले यामुळे कामगार व व्यवस्थापन असे दोन पक्ष न रहाता "एक संघ... एक कंपनी" ही संकल्पना अस्तित्वात आली.

    या आधीचा कंपनी व कामगार यांच्यातील करार हा दि. ३१.०३.२०२४ रोजी कायदयातील तरतुदींनुसार संपुष्टात आला. भारतीय कामगार सेना यांनी युनीट प्रतिनिधींमार्फत दि. १८/०३/२०२४ मागणीपत्र व्यवस्थापनास सादर केले. यावर वेळोवेळी चर्चा करण्यात येवून दि. १४.०४.२०२५ रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

    भारतीय कामगार सेना व वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. कंपनी व्यवस्थापनामधील हा १० वा त्रैवार्षिक वेतनवाढ करार असुन यात पगारवाढ यासह प्रवास व वैदयकीय भत्ता हा एक बेसीक करण्यात करण्यात आला. तसेच रात्रपाळी भत्यात वाढ, शैक्षणिक कर्जात वाढ, वैदयकिय विमा याच्यातील वाढ, उलाढाल निगडीत बोनस, तसेच इतर सेवा सवलती देण्यात येणार आहे.

    या करारासाठी कंपनी व्यवस्थापनाव्दारे श्री. सुधीर पुराणीक संचालक, श्री. सुभाष पुराणीक डायरेक्टर, श्री. मानसिंग फासे जनरल मॅनेजर, श्री. कौंत्येय अनगळ डेप्युटी जनरल मॅनेजर, श्री. शिवाजी चौंडकर मानव संसाधन प्रमुख, श्री सिध्दार्थ जाधव मानव संसाधन व्यवस्थापक यांनी स्वाक्षरी केली व हा करार करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

    भारतीय कामगार सेना, वर्ल्डवाईड ऑईल फिल्ड मशिन प्रा.लि. युनिट प्रतिनिधी यांच्यातर्फे श्री रघुनाथ कुचिक भारतीय कामगार सेना सरचिटणीस, युनिट प्रतिनिधी-श्री. आशिष जाधव अध्यक्ष, श्री. महादेव मुजुमले उपाध्यक्ष, श्री. संतोष बोराटे-चिटणीस, श्री. संदिप पांगारे सहचिटणीस, श्री. मारुती नवघणे खजिनदार यांनी स्वाक्षरी केली.

    हा करार यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले अश्या सर्वांचे भारतीय कामगार सेनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.