नवीन लेबर कोड मधील कामगार विरोधी तरतुदींमध्ये बद्दल करावेत कामगार सेल यांची मागणी मंत्रालय येथे मिटिंग संपन्न

मुंबई : केंद्र सरकारने तयार केलेल्या कामगार कायद्यांमधील बदला बाबत तयार करायच्या नियमावली मध्ये सुचना देण्याकरिता तसेच केंद्रीय लेबर कोड वर हरकती बाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालय मुंबई येथे  कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कडे मिटिंग आयोजित करण्यात आली होती.

    यामध्ये नवीन कामगार कायदे यावरती आक्षेप व सूचना मांडण्यात आल्या तसेच कामगार हिताचे निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, प्रदेश सचिव सोमनाथ आप्पा शिंदे, पुणे जिल्हा कामगार सेल अध्यक्ष प्रविण बल्लाळ, उपाध्यक्ष रामेश्र्वर निकम , IMD कामगार समन्वय संघटना वालचंदनगर चे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, कामगार सेल मिडिया कॉर्डीनेटर अमोल गायकवाड तसेच कामगार सचिव श्रीमती विनिता वैद सिंघल , उपसचिव कामगार श्रीकांत पुलकुंडवार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अप्पर कामगार आयुक्त शैलेन्द्र पोळ, सह कामगार आयुक्त रविराज इळवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.