वेरणा,गोवा : Indoco Remedies Ltd. वेरणा,गोवा येथील औषध उत्पादन निर्मिती करणाऱ्या खाजगी उद्योगामधील बहुसंख्य कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले.
याप्रसंगी डॉ.रघुनाथ कुचिक शिवसेना उपनेते यांच्या हस्ते युनिट नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी द्वारसभेला संबोधित करताना त्यांनी सांगितले कि, भारतीय कामगार सेना गोवा राज्यातील श्रमिकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहून लढा देईल, लवकरच राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधी यांचे केंद्र सरकारने केलेल्या अमानवीय शोषण कायद्याच्या बाबत अभ्यास शिबिर घेण्यात येईल.
तसेच व्यवस्थापन बरोबर उभयपक्षीय बैठक घेऊन संघटनेची ध्येय धोरण, कंपनी कडुन कामगार यांना मिळणारी वागणूक तसेच दैनंदिन विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत व्यवस्थापन प्रतिनिधी अरविंद प्रभु, रुषल, करुणाकर, युनिट अध्यक्ष प्रशांत नाईक, सरचिटणीस सर्वेश तळेकर, प्रतिनिधि अप्पा गुरव, राघवेंद्र पवार, भारतीय कामगार सेना गोवा राज्य मुख्य संघटक शंकर पंडित, विनायक पाटिल, भारतीय कामगार सेना सह चिटणिस शुभम दिघे. प्रफुल्ल सारडा, राहुल बोहरा उपस्थित होते.