Adient India Pvt Ltd, हिंजवडी येथे कामगारांचा त्रैवार्षिक करार संपन्न झाला. शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजयराव पाळेकर, रविंद्र साठे, गुलाबराव मराठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, प्रतीक पाळेकर, व्यवस्थापनाकडून प्लांट हेड निलेश बेलसरे, HR मॅनेजर सतीश कुलकर्णी स्थानिक युनियन कमिटी अध्यक्ष मच्छिंद्र तोडकर, उपाध्यक्ष अमोल ढमढेरे, सरचिटणीस जयदीप धुमाळ, खजिनदार राजेंद्र पेटकर, सदस्य वैभव माने, संतोष पाटील, संजीव म्हेत्रे, अश्विन खोपडे यावेळी उपस्थित होते.
यामध्ये सदर करार माहे १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२२ अशी तीन वर्ष कालावधी करिता करण्यात आला.
तीन वर्षाकरता सभासद कामगारांना रु.१४,७५०/- पगारवाढ देण्यात आली. ती खालील
प्रथम वर्षाकरिता - ७,६७०/-
द्वितीय वर्षाकरिता - ३,२४५/-
तृतीय वर्षाकरीता - ३,८३५/
१८ महिन्यांच्या वेतन फरक फेब्रुवारी महिन्याच्या पगारात जमा होणार, बिगर व्याजी सॅलरी ॲडव्हान्स ८०,०००/- हजारा वरून १,००,०००/- करण्यात आला, बेस्ट एम्पलोयी अवॉर्ड अंतर्गत मासिक २,०००/-, त्रैमासिक ३,०००/-, वार्षिक ५,०००/- देण्यात येणार
मेडिक्लेम ३ लाखावरून ३.५ लाख करण्यात आला,सर्वांना सारखा बोनस, नाईट शिफ्ट अलाउंस - पन्नास रुपये ऐवजी शंभर रुपये प्रति दिवस करण्यात आला.
एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर अगोदर त्या कामगाराच्या घरच्यांना इन्शुरन्स कडून आठ लाख रुपये मिळत होते आता त्यात वाढ करून रक्कम दहा लाख करण्यात आली. कंपनीमध्ये प्रथमोपचार केंद्र मध्ये MBBS डॉक्टर राहणार.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून करून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.