नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPF) मिळणारे २०१९-२० साठीचे वार्षिक व्याज ८.५ टक्के मिळणार असून हे व्याज दि. १ जानेवारी २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत ईपीएफओने ८.५ टक्के व्याज ८.१५ टक्के आणि ०.३५ टक्के दोन हप्त्यांमध्ये विभाजित करणार असे सांगितले.
तथापि, नंतर मंत्रालयाने संपूर्ण ८.५ टक्के वाटा खातेदारांच्या खात्यात एकाच वेळी टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार ईपीएफओ (EPFO) ला ८.५% व्याज देण्यास अर्थ मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याचा फायदा ६ कोटी सदस्यांना होणार आहे.