विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि.१ जुलै २०२० ते दि.३१ डिसेंबर २०२०


           मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अंतर्गत, अथवा कारखाने अधिनियम, १९४८ अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व आस्थापनांत / उद्योगांत / कारखान्यांत/ रोजगारांत, कामावर असलेल्या कामगारांना  किमान वेतन अधिनियम १९४८ लागू आहे. "किमान वेतन" या  संज्ञेत मूळ वेतन, अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते, यांचा समावेश होतो.

            शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालय द्वारे विशेष भत्ता परिपत्रक हे दर ६ महिन्याला जाहीर केले जाते. या विशेष भत्ते  मुळे त्या संबंधित अनुसूचित उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना  किमान वेतन मध्ये वाढ होते व तेवढी रक्कम कामगारांना मिळणे कायद्यानुसार गरजेचे आहे. 

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि.१ जुलै २०२० ते दि.३१ डिसेंबर २०२० खालील प्रमाणे -