ओमिनी एक्टिव प्रा.लि. येथे कायम नोकरी व वेतनवाढ करार आनंद सोहळा संपन्न

 

पारनेर : सुपा एमआयडीसी मधील ओमिनी एक्टिव प्रा.लि.औषध निर्मिती उद्योग मध्ये अनेक वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना कायम स्वरूपी नोकरी व त्रैवार्षिक वेतनवाढ करार झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असताना त्यानिमित्त कामगारांचा आनंद सोहळा पंचशील पार्क,सुपा येथे संपन्न झाला.

      करोना विषाणु साथीच्या प्रसंगात स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण करोना संसर्गजन्य साथ अवधित कामगारानीं राष्ट्रिय कर्तव्य समजून याकालावधीत पूर्ण वेळ कारखान्यात सर्व नियामाचे पालन करुन उत्पादन प्रक्रिया कार्यरत ठेवली होती. 

        कोरोना या बिकट काळात झालेली कायम नोकरी व वेतनवाढ करार सर्व कामगारांना आनंद देणारा होता. या निमित्त कंपनी कामगारांनी आनंद सोहळा साजरा केला. 

       या करिता डॉ.रघुनाथ कुचिक शिवसेना उपनेता,प्रदेश सरचिटणीस भारतीय कामगार सेना, विश्वास जगताप सहचिटणीस, शुभम दिघे, निलेश लंगोटे, पवार सर, आबा यादव यांच्यासह कैलास सोंडकर, सतीश होले, आकाश मगर, राजेंद्र पुराणे, कैलास नरवडे तसेच सर्व युनियन सभासद उपस्थित होते.