मुंबई : मा.कृषिमंत्री, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान उपक्रम राबविण्यात आला. याचा दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पुरस्कार सोहळा साजरा झाला.
यामध्ये सोलापूर शहर कामगार सेल ला प्रथम क्रमांक व सांगली जिल्हा कामगार सेल ला द्वितीय क्रमांक मिळाला या ठिकाणी सोलापुर शहर अध्यक्ष डॉ गोवर्धन संचु , सांगली जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे व शहराध्यक्ष राहुल हिरोडगी यांना खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयंत पाटील यांच्या हस्ते व शिवाजीराव खटकाळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
"मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रम पुरस्कार सोहळ्यात सर्वप्रथम कामगार सेल चा सन्मान करण्यात आला याचा आम्हाला व कामगार वर्गाला अभिमान आहे. "
- श्री.शिवाजीराव खटकाळे (भाऊ)
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल