मुंबई : कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांची वेबसाईट www.mahakamgar.maharashtra.gov.in असून यावरती कामगार विभाग अंतर्गत येणारे विविध संचालनालय जसे कामगार विभाग, कामगार आयुक्त, विकास आयुक्त (असंघटित कामगार), बाष्पके संचालनालय, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तसेच औदयोगिक सुरक्षा संचालनालय, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, बाष्पके संचालनालय सेवा, कामगार आयुक्त सेवा याविषयी कार्ये, नियम, परिपत्रक, अधिनियम, विविध माहिती ठेवली जाते.
परंतु हि वेबसाईट कधी चालू तर कधी बंद असते. जेव्हा चालू असेल त्यावेळी या वेबसाईट वरती जुनाच किमान वेतन दर तसेच सहा महिन्याला प्रसिद्ध होणारा विशेष भत्ता माहिती दाखवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वरील सर्व संचालनालय, सेवा देणारे विभाग यांचे जुनेच परिपत्रक या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत.
तसेच विविध टॅब मध्ये जुनीच माहिती तर काही ठिकाणी माहितीच दिली जात नाही या प्रकारे हि वेबसाईट अपडेट ठेवली जात नाही. तसेच कामगार यांच्याशी निगडित सर्व शासन निर्णय, परिपत्रक या वेबसाईट वरती उपलब्ध करणे गरजेचे असून याकडे देखील कामगार विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.