इचलकरंजी : नांदणी येथील गणेश बेकरी, चकोते फुड्समधील कामगारांना कायमस्वरूपी करणे, शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता, ओव्हरटाईम चा दुप्पट पगार, साप्ताहिक सुट्टी तसेच राष्ट्रीय सुट्टी त्याचा पगार, कामगारांना ईएसआय सवलत, प्रत्येक कामगारांना पगार स्लिप, महिला कामगारांसाठी पाळणाघर व चेंजिंग रूम, कामगारांसाठी कॅन्टीन व ड्रेस कोड सुविधा उपलब्ध करणे तसेच विविध मागण्यांकरिता दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासून कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन कामगार-कर्मचारी संघर्ष युनियन प्रदेक्षाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
अशी माहिती युनियनचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष सतिश मोटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बेकरी विभाग सुजित बंडगर यांनी दिली.
