कामगार नामा ट्रस्ट आयोजित "कामगार संघटना कायदा" ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात संपन्न

पुणे, दि. १८ ऑक्टोबर २०२६ - कामगार नामा ट्रस्ट, पुणे (F-0066327/PUN) आयोजित "कामगार संघटना कायदा (औद्योगिक संबंध संहिता २०२०)" या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा आज रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत उत्साहात संपन्न झाली.

     या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश जोशी (माजी विभागीय संचालक, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ व संचालक, अभय ट्रेनिंग कन्सल्टन्सी) हे लाभले होते.

     डॉ. जोशी यांनी कामगार संघटनेची व्याख्या, नोंदणी प्रक्रिया, नोंदणीकृत संघटनेचे अधिकार, नोंदणी रद्द होण्याची कारणे, रजिस्ट्रार यांची कार्ये, सभासदांचे अधिकार, संघटना मान्यता, एकत्रीकरण व विभक्तीकरणाचे नियम, रेकॉर्ड ठेवणे, वार्षिक सभा-अहवाल, तसेच दंड व शिक्षा या सर्व मुद्द्यांवर नवीन संहितेच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. सहभागींनी विचारलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.

     या कार्यशाळेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून संघटित-असंघटित कामगार, एच.आर. अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार कायदे अभ्यासक मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते.

    कामगार नामा ट्रस्टतर्फे कामगार कायदे विषयक कार्यशाळा व द्विमासिक मॅगझीनच्या माध्यमातून कामगारांना मार्गदर्शन केले जाते. पुढील कार्यशाळेची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

संपर्क: 8983070380