नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी ४५,००० रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस देण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ही रक्कम ३४,५०० रुपये होती. यंदा वाढ करण्यात आली आहे. महापौर यांनी घोषणा केली. यंदाच्या दिवाळीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ४५,००० रुपये इतका सानुग्रह अनुदान दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. पालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकसमान बोनस देणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. तसेच सुमारे ५,१२१ कर्मचारी म्हणजेच नियमित अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक-माध्यमिक शिक्षक, कंत्राटी कामगार, आशा स्वयंसेविका इ. यांनाही सरसकट ४५,००० रुपये बोनस मिळणार आहे.
महापालिकेच्या या ऐतिहासिक निर्णयाचा थेट लाभ ५,१२१ कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच पालिकेतील कंत्राटी व रोजंदारी कामगारांना तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी दूर करून ७,५०० रुपयांचे विशेष सानुग्रह आर्थिक सहाय्य (एक्स-ग्रेशिया) मंजूर करण्यात आले आहे. ज्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अत्यंत गोड होणार आहे.
