पिंपरी-चिंचवड : सर्व खेळाडू, क्रीडा प्रतिनिधी व कंपनी सभासदांना कळविण्यात येते की औद्योगिक क्रीडा संघटनेची कॅरम स्पर्धा ३ व ४ ऑक्टोबर २०२६, शनिवार व रविवार रोजी सकाळी ८ॱ३० वाजल्यापासून एसकेएफ युनियन हॉल, टाटा मोटर्स मेन गेटच्या समोर, चिंचवड येथे सुरू होणार आहे. ही स्पर्धा एसकेएफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी एकेरीचे प्रवेश मूल्य रुपये ३००/- व दुहेरीचे प्रवेश मूल्य रुपये ५००/- आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच औद्योगिक क्षेत्रामधून निवृत्त झालेल्या ६० वर्षापुढील कर्मचारी/ कामगारांसाठी(कॅरम खेळाडूसाठी) स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी फक्त ३२ खेळाडूंचीच नोंदणी केली जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.सदर स्पर्धा पुरुष व महिला खेळाडूंसाठी (औद्योगिक क्षेत्रातील) आहे.
या स्पर्धेचे सोडत (ड्रॉज) ३० सप्टेंबर २०२६, बुधवार रोजी सकाळी १ १ वाजता एसकेएफ युनियन हॉल (एसकेएफ इंडिया लिमिटेड कंपनीचे आवार) येथे काढली जाणार असून या स्पर्धेची नाव नोंदवण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२६, रविवार वेळ दुपारी २ वाजेपर्यंतची आहे तरी सर्वांनी या स्पर्धेसाठी वेळेत आपली नावे नोंदवावीत.सदर नावे वसंत ठोंबरे(९८५०८९१५९९), नरेंद्र कदम(९८२२३७०६८८), हरी देशपांडे(९८९०५२५३३१) किंवा संतोष शिंदे(९८२२७५६८९४) यांच्याकडे द्यावीत ही माहिती औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी दिलेली आहे.

