महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या वतीने कामगारांचा दाणा इंडिया प्रा ली मध्ये ऐतिहासिक चौथा वेतनवाढ करार संपन्न
चाकण (भांबोली), पुणे : भांबोली (चाकण), पुणे येथील दाणा इंडिया प्रा. लि. (Dana India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 09 जुलै 2026 रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाला.
सुमारे रु. 27,100 ची चार वर्षांसाठी वेतनवाढ, व्यापक सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि इतर अनेक कल्याणकारी तरतुदींचा समावेश असल्यामुळे हा करार महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक व सर्वांत मोठ्या करारांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.
कराराची प्रमुख वैशिष्ट्ये :
करार कालावधी : दि. 01 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2029 (4 वर्षे)
15 महिन्यांचा एरिअर्स देण्यास मान्यता
मेडिक्लेम : कर्मचारी, कुटुंब तसेच आई-वडिलांसाठी प्रत्येकी ₹4 लाखांची पॉलिसी आणि ₹4 लाखांचा बफर
रजेचा साठा : 90 वरून 100 दिवस
कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर : 3 दिवस पगारी रजा व रु. 40,000/- आर्थिक मदत
251–270 दिवस – रु. 5,000/-
281 पेक्षा जास्त दिवस – रु. 10,000/-
मासिक अटेंडन्स अलाउन्स : रु. 1,900/-
शिफ्ट अलाउन्स : 24 प्रति दिवस
आऊट स्टेशन अलाउन्स : रु.500/-
फॅमिली डे : दरवर्षी एकदा
कॅन्टीन सुविधा : विद्यमान सुविधांव्यतिरिक्त 1ली व 2री शिफ्टला केळी आणि नाईट शिफ्टला दूध
गणवेश : दरवर्षी 2 ड्रेस, 1 टी-शर्ट, सेफ्टी वीकमध्ये 1 टी-शर्ट आणि 4 वर्षांत 2 वेळा जर्किन
बिनव्याजी टर्म लोन : रु.1.50 लाख
ग्रुप अपघात विमा : रु.10 लाख
WCP लम्पसम : रु.16 लाख
डेथ बेनिफिट : मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास ₹20 लाखांची मदत
गुणवंत कामगार पुरस्कार : रु.11,000/- (नवीन योजना)
हा करार यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, आणि यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष विजयभाऊ काळोखे, सेक्रेटरी गोविंद मोहिते, युनिट अध्यक्ष अमित लांडगे, उपाध्यक्ष बालाजी खंकाळ, जनरल सेक्रेटरी सुदर्शन नांदखिले, खजिनदार दत्ताभाऊ शिंदे, युनिट सदस्य अक्षय सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कंपनीच्या वतीने प्लांट मॅनेजर निलेश देसले, HR हेड शिवपाल जाधव आणि उत्पादन विभाग प्रमुख विजय कुमार उपस्थित होते.
व्यवस्थापनाचा सकारात्मक दृष्टिकोन, परस्पर विश्वास आणि सर्व कामगारांनी दाखविलेला संयम, शिस्त व सहकार्य यामुळे हा ऐतिहासिक करार यशस्वीपणे पूर्ण झाला. "कामगारांच्या हितासाठी, सुरक्षित भविष्यासाठी आणि औद्योगिक शांततेसाठी हा करार एक नवा आदर्श ठरेल."

