पुणे : कामगार नामा ट्रस्ट व अमेय ट्रेनिंग कन्सलटन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार, कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या करिता मागणी पत्रक तयार करणे आणि वाटाघाटी करणे यांच्या बद्दल जनजागृती व्हावी याकरिता रविवार दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता यावेळेत ऑनलाईन सेमिनार घेण्यात आले यामध्ये ५० विविध कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
या सेमिनारचे मार्गदर्शन डॉ. प्रकाश जोशी ,माजी विभागीय संचालक केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ संचालक, अमेय ट्रेनिंग कन्सल्टन्सी यांनी केले.
1 मागणी पत्रक तयार करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
2 मागणी पत्रक तयार करताना घ्यावयाची काळजी
3 वाटाघाटीचे कौशल्य
सेमिनार मध्ये विविध कामगार संघटनेच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले यावरती डॉ. प्रकाश जोशी यांनी मार्गदर्शन केले.
कामगार संघटना, प्रतिनिधी, विविध आस्थापना यांना या वरील विषयावरती ऑनलाईन अथवा ऑफलाईन सेमिनार घ्यावयाचे असल्यास त्यांनी 8983070380 या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन कामगार नामा ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले.
