चाकण : येथील Ross Process Equipment Pvt. Ltd. मध्ये दिनांक 28 मे 2026 रोजी कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य (उत्पादन व सेवा) कामगार उत्कर्ष संघटना यांच्यात यशस्वी वेतन करार संपन्न झाला. हा करार औद्योगिक सलोखा, परस्पर विश्वास आणि सकारात्मक संवादाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
या कराराच्या चर्चेदरम्यान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेन्द्र सिंह आणि संचालक (ऑपरेशन्स) श्री. राजेंद्र कचरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एचआर व आयआर प्रमुख श्री. अमित केदारी, सौ. कामिनी कालोडे आणि श्री. महेश महांगरे यांच्या समन्वयातून संपूर्ण वाटाघाटी यशस्वीपणे पार पडल्या. कंपनीचे कायदेशीर सल्लागार ॲड.प्रशांत क्षीरसागर आणि ॲड अनिरुद्ध सानप (सर्वज्ञ लीगल असोसिएट्स) यांनी चर्चेला मोलाचे मार्गदर्शन केले.
कामगारांच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस श्री. शिवाजीराव खटकाळे, श्री. सुरेश शिंदे आणि श्री. शिवाजी वाळवंकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कामगारांचे प्रतिनिधित्व केले.
दिनांक 14 मे 2026 पासून सुरू झालेल्या वेतन कराराच्या वाटाघाटी केवळ तीन बैठकींमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. या करारानुसार कामगारांना चार वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ₹13,000 ची वेतनवाढ तसेच इतर विविध आर्थिक व कल्याणकारी लाभ मंजूर करण्यात आले आहेत.
करारानंतर कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेचे सरचिटणीस श्री. शिवाजीराव खटकाळे यांनी कंपनी व्यवस्थापन, श्री. अमित केदारी, सौ. कामिनी कालोडे, श्री. महेश महांगरे तसेच कंपनीचे सल्लागार .ॲडव्होकेट प्रशांत क्षीरसागर आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध सानप यांचे विशेष आभार व्यक्त केले.
हा वेतन करार चाकण औद्योगिक क्षेत्रातील सकारात्मक औद्योगिक संबंधांना अधिक बळकटी देणारा ठरला असून, व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर सहकार्य, विश्वास आणि संवाद यांचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. भविष्यातही अशाच सलोख्याच्या वातावरणात कंपनीच्या प्रगतीसह कामगारांचे कल्याण साध्य करण्याचा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

