चाकण : वाहन उद्योगात अग्रेसर असलेली पुणे चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधील 2340 कायमस्वरूपी कामगारांसाठीचा 3.5 वर्षांकरिता वेतन वाढीचा करार महिंद्रा & महिंद्रा असोसिएट युनियन आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांच्यामध्ये मुदतपूर्व वेतन करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये:-
वर्ष पाहिले 13,974 + 1,677 महागाई भत्ता 15,651/-
वर्ष दुसरे 1,118 + 1,677 महागाई भत्ता = 2,795/-
वर्ष तिसरे 1,118 + 1,677 महागाई भत्ता 2,795/-
वर्ष चौथे 497 + 620 महागाई भत्ता = 1,117/-
एकूण पगारवाढ 22,358/- (IN HAND)
PF 501/-, GRATUITY 201/-
GROSS 23,060/- रुपये
FACILITY + CTC=25,200/-
उत्पादन वाढ 11%
कराराची इतर ठळक वैशिष्ट्ये :-
1.Salary Advance - यामध्ये 2. Gross Salary पगार उचल म्हणून 130 संघटना सभासदांना मिळतील की ज्या मागिल करारात 75 होत्या त्यात 55 ने वाढ केली.
2. सेफ्टी शूज मध्ये बदल करून चांगल्या दर्जाचा शूज देण्याचे मान्य करण्यात आले.
3. शिलाई भत्ता मध्ये 950 च्या जागी बदल करून 1300 रुपये इतकी करण्यात आली.
4. जर्किंग मध्ये 900 रुपयांच्या जागी 1300 रुपये इतकी रक्कम ठरवण्यात आली.
5. रात्रपाळी भत्यात वाढ करून 125 च्या जागी 210 रुपये एका आठवड्यासाठी करधितांत आला.
6. LTA मध्ये 500 रुपयांनी वाढ करून 5000 इतका करण्यात आला.
7. आई वडील मेडिक्लेम पॉलिसी मध्ये व्यवस्थापनाकडे 40% भार आणि संघटना सभासदांकडे 60% भार असा होता आता त्यात बदल करून 50%, 50% भार दोघांकडे करण्यात आला की ज्यामध्ये एक रविवार कमी करण्यात आला.
8. फॅमिली मेडिक्लेम मध्ये 25 हजार रुपयांची वाढ करून ती दोन लाख करण्यात आली.
9. फॅमिली मेडिक्लेम मध्ये 10 बफर ने वाढ करून 30 चे 40 बफर करण्यात आले.
10. स्पेशल केस मध्ये आपण पहिल्यांदाच एम्प्लॉई नंतर पत्नी आणि मुले समाविष्ट करण्यात आले आहे( सात केसेस साठी दोन लाख रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले).
11. ग्रुप टर्म पॉलिसी आपण नविन सुरू करत आहोत. त्याची रक्कम 30 लाख रुपये असेल आणि त्याचा भार व्यवस्थापन आणि कामगार सभासद प्रत्येकी 50% असे असेल.
12. डेथ बेनिवल फंड पॉलिसीमध्ये नैसर्गिक मृत्यूस चार लाख रक्कम ठेवण्यात आली.
13. ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी एक लाख रुपयांची वाढ करून सात लाख रुपये करण्यात आली. अपघाती काळात कंपनीमध्ये गैरहजर असल्यास प्रत्येक आठवड्याला 7000 रुपये रक्कम मिळणार.
14. PL घेण्यासाठी एक नविन टप्पा वाढ करून चार च्या जागी पाच करण्यात आली.
15. PL स्लॅब मध्ये बदल करून 285 दिवसांसाठी एक लिव्ह वाढवण्यात आली.
16. PL लिव्ह साठवणुकीमध्ये 2 ने वाढ करून 75 च्या जागी 77 करण्यात आले. EL मध्ये 3 ने वाढ करून 37 च्या जागी 40 केले.
त्यामध्ये दुखवटा रजा आणि मेडिकल रजा देण्यात येतील त्यामध्ये व्यवस्थापन आणि संघटना मिळून त्यावर निर्णय घेतील.
18. हाल्प डे दोन ने वाढ करून दोन च्या जागी चार केले. त्यानंतर पाचवा इमर्जन्सी म्हणून घेऊ शकतो त्यासाठी डॉक्यूमेन्ट जमा करणे बंधनकारक राहील.
19. Consumer store मध्ये इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू कमीतकमी किंमतीत मिळण्यासाठी व्यवस्थापन आणि संघटना मिळून Consumer store उपलब्ध करून दिले जाईल.
20.आपल्या प्लांट मधिल लिलाव पद्धतीच्या गाड्या देताना पहिले संघटना सभासदांना प्राधान्य दिले जाईल.
21. युनियन संघटनेचे इलेक्शन हे मागच्या वेळी कंपनी मध्ये जसे झाले तसेच पुढील काळात देखिल प्लांट च्या आताच पूर्ववत करण्यात आले.
22. मेडिक्लेम स्पेशल केसचा मागच्या 2022 च्या करारामधील 2.10 हा मुद्दा चेंज झाला होता की ज्यामुळे स्पेशल केस साठी अडचण येऊ शकत होती परंतु तो मुद्दा या करारात सुधारणा केला आहे.
23. 1 वर्ष आधी UNION COD व्यवस्थापनाला देण्यात येऊन त्यावर चर्चा चालू करण्यात यावी हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला.
24. व्यवस्थापनास संघटनेने दिलेले काही मुद्दे.
1. कामवाढ 11% देण्याचे मान्य करण्यात आले. जी मागच्या करारात कामवाढ (10.5%) होती.
2. पगारवाढ ही 70%, 12.5%, 12.5%, आणि 5% अशी करण्यात आली.
3. कॅन्टीन आणि ट्रान्सपोर्ट मध्ये प्रत्येकी 150 रुपयांनी वाढ करण्यात आली.
सदर मुदतपूर्व यशस्वीरीत्या करार करण्यासाठी संघटनेचे प्रमुख सल्लागार माजी राज्यमंत्री श्री सचिन भाऊ अहिर याचें मोलाचे सहकार्य लाभले
करारा वरती व्यवस्थापना तर्फे महिंद्रा कंपनीचे सीईओ श्री विनय खानोलकर, प्लांट हेड श्री श्रीकांत डुबे, व्हॉइस प्रेसिडेंट संग्रामसिंह देशमुख, जनरल मॅनेजर इ आर श्री श्रेयश आचार्य, डेप्युटी जनरल मॅनेजर श्री वैभव मुंगी आणि संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री. सचिन भाऊ अहिर तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदिप तळेकर, सचिव श्री सुशांत मोहिते, उपाध्यक्ष श्री संतोष भुजबळ, सहसचिव श्री रवींद्र काळभोर, खजिनदार श्री प्रशांत पटारे, सदस्य श्री सुयोग भालेकर, श्री धनंजय मुंगसे, श्री शाम भापकर, श्री नितेश शिर्के, श्री विष्णु शेळके यांनी स्वाक्षरी केल्या.
हा करार फक्त वेतनवाढ करार न होता त्यामध्ये कामगारांसाठी व प्रामुख्याने त्यांच्या आप्त कुटुंबियांसाठी काही नव्या आणि महत्वाच्या सुविधा देखील मिळविण्यात युनियन कमिटीला यश आले आहे त्यामुळे कामगारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे .
सध्या देशा देशांतर्गत असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा कमी असल्याकारणाने व अंतर्गत व्यवसायातील काही कारणामुळे पुणे व चाकण एमआयडीसीतील करार हे वेळेवर होत नसताना देखील या परिस्थितीमध्ये सचिन अहिर व युनियन संघटना यांच्या अविरत प्रयत्नामुळे कामगारांना मुदतपूर्व करार, चांगला आकडा, सौहार्दपूर्ण घवातावरणात घेण्यात यश मिळाले आहे.


