पुणे : संपूर्ण देशात अग्रगण्य असलेल्या मनुष्यबळ विकास कर्मचारी यांच्या उन्नतीसाठी एनआयपीएम अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट संस्थेचा वार्षिक ४६ वा वर्धापन दिन अलीकडे रविवारी सायंकाळी पूणा क्लब च्या हिरवळीवर उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्रादेशिक कामगार आयुक्त श्री अश्वनीकुमार आणि प्रादेशिक पीएफ आयुक्त श्री अमित वशिष्ठ तर यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विश्वेश कुलकर्णी,यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला एन आय पी एम पुणे विभाग प्रमुख अध्यक्ष डॉ. कल्याण पवार, सचिव डॉ अजित ठाकुर, सहसचिव ॲड प्रशांत क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब सोनवणे, आणि खजिनदार डॉ संजय झोपे, माझी विभाग प्रमुख डॉ सदाशिव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
एन आय पी एम राष्ट्रीय पदाधिकारी आणि पुणे विभागाचे पदाधिकारी, पिंपरी चिंचवड आणि सातारा विभागाचे पदाधिकारी आणी सलग्न मॅनेजमेंट संस्थेचे पदाधिकारी, आजन्म सदस्य आणि त्यांचे कुटुंब मित्रपरिवार मिळून अंदाजे पाचशे लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अश्वनीकुमार आणि अमित वशिष्ठ यांनी दीप प्रज्वलन करून केली. ह्यावेळी गणेश वंदना करण्यात आली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वच प्रमुख वक्त्यांनी मानव संसाधन विकास क्षेत्रात काम करत असताना नित्य नवीन येणाऱ्या आव्हानाचे कुशलतेने निराकरण करणे आणि त्यासाठी कुटुंबाचे योगदान महत्वाचे आहे असे गौरवोद्गार काढले. वर्षातून एकदा संस्थेच्या सर्व सदस्यांनी कुटुंबासह एकत्रित येणे आणि एकमेकाच्य कौशल्यपूर्ण कार्याचे सामुदायिक पद्धतीने कौतुक करणे अशी गोष्ट आजच्या धावपळीच्या जीवनात फार महत्वाची आहे असे विचार संस्थेचे पुणे विभाग प्रमुख डॉ कल्याण पवार यांनी मांडले. या प्रसंगी गेल्या पाच दशकात मनुष्य बळ विभाग आणि एन आय पी एम संस्थेच्या जडण घडण कार्यक्रमात मोलाची जबाबदारी घेणाऱ्या एनआयपीमच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्यामध्ये श्री निंबाळकर, श्री राजू नागेशकर, डॉ. शशिकांत कुर्बेटी , श्री. मिलिंद कोलगुड, श्री माणिकराव पाटील, अँड निर्मल याचे यावेळी श्री विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृतिपत्र देऊन विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी एनआयपीएमचे महत्व आणि पुढील वाटचालीसाठी तरुणाचा सहभाग याचे महत्व विशद केले आणि पुणे विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी पुणे विभागातील सदस्य आणि त्यांचे परिवार यांचे तीस मान्यवरांचे वेगवेगळ्या विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते मान पत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अलबेला संगीत समूह पुणे यांचा संगीत आणि लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोबत सर्वासाठी प्रीतिभोजन आयोजित करण्यात आले होते. सहप्रायोजक इमाजिका एंटरटेनमेंट यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. प्राची सोनचल तर आभार प्रदर्शन डॉक्टर कीर्ती धारवाडकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता सर्व सदस्यांना भेटवस्तू देऊन करण्यात आली.


