पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२६ - कामगार नामा ट्रस्ट, पुणे (F-0066327/PUN) यांच्या वतीने कामगार कायदे विषयक ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचा विषय - कामगार संघटना कायदा (औद्योगिक संबंध संहिता २०२०) हा असून मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश जोशी (माजी विभागीय संचालक, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ व संचालक, अभय ट्रेनिंग कन्सल्टन्सी) हे मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्या, कामगार संघटनेची नोंदणी, नोंदणीकृत संघटनेचे अधिकार, नोंदणी रद्द होण्याची कारणे, रजिस्ट्रार कामगार संघटना यांची कार्ये, नोंदणी केलेल्या संघटनेच्या सभासदांचे अधिकार, कामगार संघटना मान्यता, कामगार संघटना एकत्र येणे किंवा विभक्त होण्यासाठीचे नियम, कामगार संघटनेचे रेकॉर्ड, वार्षिक सभा व अहवाल, दंड व शिक्षा.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
सहभाग नोंदणीचे पर्याय :
पर्याय क्र. १ : कामगार नामा मॅगझीन मेंबरशिप रु. ७००/- भरल्यास सेमिनारची Joining ID मोफत मिळेल व दोन महिन्याला १ याप्रमाणे वर्षात ६ अंक घरपोच मिळतील. तसेच एक वर्ष जे ऑनलाईन सेमिनार त्यामध्ये ५०% सूट.
पर्याय क्र. २ : केवळ सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी रु. २००/-
पर्याय क्र. ३ : कामगार नामा मॅगझीनचे सभासद असलेल्यांसाठी रु. १००/-
इच्छुकांनी PhonePe - ८९८३०७०३८० या नंबरवर पेमेंट करून संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर याच नंबरवर व्हॉट्सअप करावा. QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८९८३०७०३८०
