पुणे : श्री गणेश लक्ष्मणराव ताठे, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांचा दि.१०/०३/२०२६ रोजी सणसवाडी औद्योगिक वसाहत व रांजणगाव औद्योगिक वसाहत तसेच दि.११/०३/२०२६ रोजी चाकण औद्योगिक वसाहत याभागात किमान वेतन पाहणी दौरा होणार आहे. या दौऱ्यावेळी सहायक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
कामगारांना मिळणारे किमान वेतन तरतुदी यांचा लाभ मिळाला पाहिजे याबाबत श्री गणेश ताठे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ (महाराष्ट्र राज्य) आग्रही भूमिका आहे. राज्यातील एखाद्या भागात कामगारांना किमान वेतन मिळत नसेल तर त्याबाबत तक्रार किमान वेतन सल्लागार मंडळ यांच्या कडे करावी.
