ऊरवडे (मुळशी) : येथील मे. एस एफ एस ग्रुप इंडिया प्रा. लि. कंपनीतील कामगारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यास मा. औद्योगिक न्यायालयाने दिला अंतरिम मनाई आदेश दिला असल्याबाबत श्रमिक एकता महासंघ यांनी सांगितले आहे.
श्रमिक एकता महासंघाला संलग्न असलेल्या एस एफ एस ग्रुप इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या पाच सभासदांविरुद्ध उत्पादन वाढ न दिल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस व्यवस्थापनाने बजावल्या होत्या. वेतन करारात ठरल्यानुसार कामगार उत्पादन देत असताना त्याहून अधिकची उत्पादन वाढ कामगारांनी द्यावी या हेतूने व्यवस्थापन कामगारांविरुद्ध शिस्तभंगाच्या कार्यवाही करत होते.
व्यवस्थापनाच्या अशा अनुचित कामगार प्रथा विरुद्ध श्रमिक एकता महासंघाच्या मार्गदर्शनाखाली युनियनने मा. औद्योगिक न्यायालय, पुणे येथे दिनांक 16 मार्च 2026 रोजी व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता.
दिनांक 23 मार्च 2026 रोजी त्यावर मा. औद्योगिक न्यायालयाने अंतरिम मनाई आदेश देऊन सदर पाच कामगारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे निर्देश व्यवस्थापनास दिले आहेत. त्यामुळे युनियन व कामगारांना दिलासा मिळाला आहे.
युनियनच्या वतीने श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे तसेच जेष्ठ विधीतज्ञ श्री नितीन कुलकर्णी यांनी काम पाहिले.
