पुराटोस फूड इंग्रिडिएंट्स इंडिया प्रा. लिमि. (Puratos Food Ingredients India Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव एमआयडीसी, शिरूर, जि पुणे येथील पुराटोस फूड इंग्रिडिएंट्स इंडिया प्रा. लिमि. (Puratos Food Ingredients India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि पुराटोस फूड इंग्रिडिएंट्स एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

पगारवाढ : रु.१५,५००/- इतकी पगारवाढ त्यापैकी ५०% मुळ पगार आणि ५०% इतर भत्यामध्ये मिळणार आहे.
पहिल्या वर्षी : रु.६,०००/-
दुसऱ्या वर्षी : रु.४,७५०/-
तिसऱ्या वर्षी : रु.४,७५०/-

करार कालावधी : दि.०१/०४/२०२५ ते दि.३१/०३/२०२८ या तीन वर्षासाठी असेल.

फरक रक्कम : कंपनीतील कामगारांना ७२,०००/- इतकी इतकी रक्कम फरक माहे मार्च २०२६ च्या पगारासोबत मिळणार आहे.

मेडिक्लेम : कामगारांचा रु.३,००,०००/- मेडिक्लेम कंपनीच्या वतीने उतरविण्यात येणार आहे.

बोनस : कायद्याप्रमाणे मिळणारा बोनस व युनिकॉर्न बोनस असे दोन बोनस मिळणार आहेत

इतर : कामगारांना वर्षातून तीन गणवेश, टी शर्ट, पॅटर्निटी लिव्ह, वाढदिवसाची रजा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे.

     या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने श्री अशीस शेठ (व्यवस्थापकीय संचालक), श्री बलविंदर सिंग (एचआर हेड), महेंद्र बोटे (उत्पादन हेड), अजिंक्य भालेराव (सहायक उत्पादन हेड) लसेच संघटनेच्या वतीने संघटनेचे सल्लागार कामगार नेते रामचंद्र शरमाळे आणि पुराटोस फूड इंग्रिडिएंट्स एम्प्लॉईज युनियन वतीने अन्वर शेख (अध्यक्ष), भाऊसाहेब पांचगे (जन सेक्रेटरी), तेजस सावंत, शिवाजी आढाव, संकेत चौधरी, सचिन चौधरी यांनी सह्या केल्या. हा करार यशस्वी कर पार पडण्यामध्ये अजित चौधरी, रणजीत चव्हाण आणि व्यवस्थापन कायदा सल्लागार ॲड जयंत शाळीग्राम यांची मोलाची साथ मिळाली.