पुणे : एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, चिंचवड येथे सुरू असलेल्या शांत, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध संपाच्या शंभराव्या दिवशी (२ डिसेंबर २०२५) एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबिर” व “मोफत आरोग्य तपासणी शिबिर” हा सामाजिक उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमाला कामगार बांधव, विविध उद्योगांतील कामगार संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी तसेच पिंपरी–चिंचवड महानगरातील सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अनेकांनी सहभाग घेऊन विविध वैद्यकीय तपासण्या व सल्ल्याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे मार्गदर्शक व सर्वेसर्वा मा. श्री. राजन नायर साहेब यांनी केले. त्यांच्या नेतृत्वामुळे हा उपक्रम सामाजिक जबाबदारी व कामगारांच्या एकजुटीचे प्रतीक ठरला. तसेच श्री. संदीपजी जाधव साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय कर्मचारी सेना (शिंदे गट) यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले अध्यक्ष : श्री. संपत देवराम वाघोले, उपाध्यक्ष : श्री. अमर तानाजी काटे, जनरल सेक्रेटरी : श्री. गोविंद प्रभू वांजळे, खजिनदार : श्री. प्रकाश परशुराम माने, सहसेक्रेटरी : श्री. गोरख दगडोबा खुटवड, सदस्य : श्री. संजय प्रभाकर शेळके, सदस्य : श्री. अजय पोपटगिरी गोसावी
एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेतर्फे सर्व रक्तदाते, डॉक्टर, वैद्यकीय पथक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडलेला हा कार्यक्रम कामगारांच्या न्याय्य लढ्याला निश्चितच नवे बळ देणारा ठरला आहे.
