एक्साईड परिवर्तन कामगार संघटना कामगारांच्या लढ्याला यश, कामगारांना नियमित पगार देण्याचे आदेश

पुणे : एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेच्या कामगारांच्या संपाला आणि लढ्याला यश आले असून एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड चिंचवड एमआयडीसी पुणे येथील कामगारांचा संप कायदेशीर असल्याने कामगारांना नियमित पगार देण्याचे आदेश मा. न्यायमूर्ती डी. एम. पाटील यांचा निर्णय दिला असलेबाबत संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेली सविस्तर पत्रक पुढील प्रमाणे - 

कंपनी व्यवस्थापनाच्या दबाव तंत्राच्या व अनुचित कामगार प्रथांच्या विरुद्ध मा. औद्योगिक न्यायालय पुणे येथे एक्साईड परिवर्तन कामगार संघटना यांनी तक्रार (यू.एल.पी) नंबर १४५/२०२५ दाखल केली होती. सदर तक्रार प्रकरणी एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड व्यवस्थापनाचे म्हणणे, युक्तिवाद आणि एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे युक्तिवाद ऐकून घेऊन मा. औद्योगिक न्यायालय पुणे यांनी दिनांक २८/१०/२०२५ रोजी निकाल देण्यात आलेला आहे. उभय पक्ष्यांचे म्हणणे व कागदपत्र विचारात घेऊन न्यायमूर्ती मा. डी एम पाटील साहेब, औद्योगिक न्यायालय पुणे यांनी एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाला आदेश देण्यात आलेले आहे की,

कायदेशीर संप करीत असलेल्या कामगारांना नियमितपणे संप काळातील पगार देण्यात यावा, व मागील पगार १५ दिवसाचे आत देण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे संपा वरील कायम कामगारांचे काम कंत्राटी कामगारांकडून करून घेण्यात येऊ नये असे प्रतिबंधात्मक आदेश कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आलेले आहेत.

तसेच मोटर सायकल विभागातील मशिनरी व प्लांट अन्यत्र शिफ्ट करण्यात येऊ नयेत, कंपनी व्यवस्थापनाला बंदी करण्यात आलेली आहे, असे प्रतिबंधात्मक आदेश दिनांक २८/१०/२०२५ रोजी देण्यात आलेले आहेत.

मा. औद्योगिक न्यायालय पुणे यांनी त्यांच्या निकाल पात्रात निर्णय देताना स्पष्टपणे नमूद केलेले आहे की एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड व्यवस्थापनाने प्रथम दर्शनी अनुचित कामगार प्रथा चा वापर केला असल्याचे जाहीर केलेले आहे. तसे अनुचित कामगार प्रथा करण्यास प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आलेले आहेत.

सदरच्या मा. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशामुळे कामगारांच्या लढ्याला यश मिळाले आहे. कामगारांच्या व कामगार संघटनेच्या मागणीची दखल मा. न्यायालयाने घेतलेली आहे. एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे वतीने ज्येष्ठ कामगार सल्‌लागार अॅड. संतोष म्हस्के यांनी कामगारांचे वतीने औद्योगिक न्यायालयात भक्कम पणे बाजू मांडली. आणि कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.

       सदरच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे औद्योगिक शांतता कायम राहण्यास मदत होणार आहे. एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या संपामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे भूतपूर्व न्यायमूर्ती श्री. बी. जी. कोळसे पाटील साहेब यांनी समक्ष संपामध्ये सहभाग घेऊन कामगारांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सहकार्य व योगदान दिले होते. तसेच संघटनेचे सल्लागार व मार्दर्शक ज्येष्ठ कामगार नेते श्री. राजन नायर साहेब ज्येष्ठ कामगार नेते भरत शिंदे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे युनियन लीडर श्री विनोद खुरंगले, यांचे कामगारांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य या कामगारांना मिळत होते.

     एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. संपत वाघोले, जनरल सेक्रेटरी श्री. गोविंद वांजळे, उपाध्यक्ष श्री. अमर काटे, खजिनदार श्री. प्रकाश माने, सह सेक्रेटरी श्री. गोरक खुटवड, सदस्य श्री. संजय शेळके, सदस्य श्री. अजय गोसावी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेच्या कामगारांच्या लढ्याला यश, कामगारांना नियमित पगार देण्याचे आदेश पाहण्यासाठी - क्लिक करा