वर्धा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना न्यायहक्क, सुरक्षा सुविधा, तसेच कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभमिळावा यासाठी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेतर्फे जिल्हास्तरीय मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने आयोजित केला आहे. सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे मेळावा पार पडणार आहे.
या मेळाव्यात विविध तालुक्यातील महिला व पुरुष बांधकाम कामगार सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. कामगारांना आरोग्य, विमा, पेन्शन, शिष्यवृत्ती, गृहअनुदान आदी अनेक योजना लाभमिळूनही त्याचा प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहोचत नाही, पार्श्वभूमीवर अशा हा मेळावा विशेष महत्त्वाचा आहे. संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासानी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यासाठी ३ नोव्हेंबरचा मेळावा हा एक व्यापक आरंभ ठरणार आहे.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे जनआंदोलनाचा म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने, आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे, माजी खा. रामदास तडस, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल मंबईचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश यादव, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, यशवंत झाडे, अटल पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता राजू मुठाळ, मारोती मुठाळ, देवश्री ठाकरे, खटेश्वर देवलकर, मनीषा दिलीप कोरे, नरेंद्र मानकर, कोंबे, आशिष बुरबुरे, अरविंद गौळकर, नीलिमा पळसकर, रजनी पोकळे, भास्कर गणोरे, दिनेश धुर्वे, सुनील नेहारे, श्रीकांत पाल, भारत पाल, नितीन ढगे, अतुल रेवसकर, विजय आष्टनकर, प्रवीण आष्टनकर, राजेंद्र घोडमारे, अविनाश कोसाळे प्रयत्नशील आहेत.
