ट्रॅक कंपोनन्ट्स लि. (Track Components Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : येथील औद्योगिक वसाहती मधील ट्रॅक कंपोनन्ट्स लि. (Track Components Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, पै. श्री.रोहिदास गाडे व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष, कामगार नेते श्री. जीवनशेठ येळवंडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

कराराचा कालावधी : दि.०१/०४/२०२४ ते दि.३१/०३/२०२७ या तीन वर्षांचा राहील.

एकूण पगारवाढ : रु.१४,१००/- (चौदा हजार शंभर रुपये)

पगाराचा रेशो : पहिल्या वर्षी ८०% दुसऱ्या वर्षी १०% तिसऱ्या वर्षी १०% मिळणार.

प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.

मेडिक्लेम पॉलीसी  : रु.१५००००/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये ) संपूर्ण खर्च कंपनी करणार व अधिकची ३०००००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात आला आहे.

मृत्यू साहाय्य योजना : 
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा आणि सर्व स्टाफचा एक दिवसांचा पगार व रु.७,००,०००/- रुपये (सात लाख रुपये फक्त)  कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी: रु.५,००,०००/- लाख रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.

जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्धवणार्‍या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करणार

सूटया : A) PL - १५, B) SL - ०८, C) CL - ०८, D) PH - १०

मतदानाची सुट्टी :  सरकारी आदेशानुसार राहील,

दिवाळी बोनस : रु. १५,२२८/- रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल व रु.१७००/- रुपये गिफ्ट म्हणून देण्यात  येईल.

मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- (एक हजार) रुपये देण्याचे मान्य व त्यामध्ये दोन शॉर्ट लिव्ह ग्राह्य धरण्यात येतील कंपनीमध्ये अपघात झाल्यास तो कामगार या योजनेस पात्र राहील.

कायमस्वरूपी कामगार : १० कामगारांना ०३ टप्प्यामध्ये कायम करून (Permanent letor) देण्यात येईल हे मान्य केले आहे. 

सेवा बक्षीस : प्रत्येक कामगारास सेवा बक्षीस दिले जाईल 
१) १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना रुपये २००००/- (वीस हजार रुपये)
२) १५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना रुपये २५०००/- रुपये (पंचवीस हजार रुपये)
याप्रमाणे सेवा बक्षीस दिले जाईल.

वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास रु.५०,०००/- (पन्नास हजार) रुपये देण्याचे मान्य केले आहे.

गुणवंत कामगार पुरस्कार : प्रत्येक महिन्याला २ गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना रु.१०००/- रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य.

     करारावरती  व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO श्री. राजेश खन्ना साहेब, प्लांट हेड. श्री.गिरीश भेंडगावे साहेब, एच आर मॅनेजर श्री. अविनाश चोरमाले साहेब, श्री जयदीप काटकर तसेच

    संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. श्री रोहिदास गाड़े, संघटनेचे अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, सचिव - श्री रघुनाथ मोरे , खजिनदार श्री.अमृत चौधरी, श्री भट्टू पाटील, श्री. महादेव येळवंडे, श्री. प्रशांतआप्पा पाडेकर, श्री. रविंद्र भालेराव, ग्रुपो अंतोलीन युनिट अध्यक्ष  श्री. संजय पाटील, ग्रुप अंतोलीन सचिव- महेंद्र कदम, ट्रॅक  यूनिट अध्यक्ष श्री. दीपक ब-हाटे,  उपाध्यक्ष श्री. मिंटू कुमार, सरचिटणीस श्री. प्रविण वाडेकर, सहचिटणीस श्री अनिल कुंभार, खजिनदार श्री सवाई सिंह, यांनी सह्या केल्या.

    संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री.महेशदादा लांडगे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, आणि व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO श्री. राजेश खन्ना यांनी उपस्थित कामगार व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच.आर हेड श्री अविनाश चोरमले यांनी केले, तसेच सूत्रसंचालन पुजाताई थिगळे यांनी केले व खजिनदार श्री. अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून तसेच फटाक्याची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.