शिवक्रांती कामगार संघटना, बेंटलर ऑटोमोटिव्ह युनिट यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थी यांना केली एक लाख रुपयांची मदत

पुणे : मराठवाड्यामध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.  अशा शेतकऱ्यांची मुले ही पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी राहत आहेत त्यांना घरून आर्थिक मदत मिळणे खूप अवघड झाले त्यामुळे त्यांच्या शिक्षणात विघ्न येत होते अशा मुलांना मदतीचे आवाहन  झी 24 तास या वृत्त वाहिनेने " एक हात मदतीचा " या नावाने केले होते.

  त्याला अनुसरून शिवक्रांती कामगार संघटना, बेंटलर ऑटोमोटिव्ह युनिट, खालुम्ब्रे चाकण यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून  या वर्षी कामगार नेते ऍड विजयराव पाळेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली अशा चार गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 25000/-  रकमेचा धनादेश देण्यात आला.

    अशा प्रकारे एकूण रुपये 1,00,000/- (एक लाख) रुपयाचे आर्थिक सहकार्य  या गरजू मुलांना करण्यात आले या कार्यक्रमास आपल्या संघटनेचे खजिनदार रवींद्र साठे  आणि बेंटलर ऑटोमोटिव्हचे एम डी मुकुंद गणगणे, मॅनेजमेंट  प्रतिनिधी आणि कामगार सहकारी  उपस्थित होते.