सांगली : इस्लामपूर चे सुपुत्र कामगार नेते अमित बजरंग कदम यांची महाराष्ट्र राज्य कामगार किमान वेतन सल्लागार मंडळ चे अध्यक्ष श्री.गणेश ताठे ( राज्यमंत्री दर्जा) यांच्या जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.
गेल्या १६ वर्षापासून अमित कदम कामगार क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा लाखो कामगार यांना होईल सदर महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ हे सर्व कामगारांचे दैनिक वेतन ठरवत असते त्यामुळे अमित कदम यांची नियुक्ती कामगार न्याय मिळवून देईल नियुक्ती चे पत्र आमदार संजय केणेकर व अध्यक्ष गणेश ताठे यांनी मुंबई येथे दिले.
