पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील ब्रिटनस कार्पेट इंडिया लिमिटेड या कंपनी ने नुकत्याच मराठवाड्यामध्ये झालेल्या भीषण अतिवृष्टी व पूरग्रस्त लोकांसाठी मुख्यमंत्रि सहाय्यता निधीमध्ये रु.३,००,०००/- (तीन लाख) योगदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याप्रसंगी कंपनीचे त्याच्यावर प्लांट हेड व मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्री सतीश करंजकर म्हणाले की ही मदत जरी छोटी असली तरीही, ज्यांना या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा पूरग्रस्त लोकांना काही अंशी तरी निश्चितच लाभ होईल.
या योगदानाबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वैयक्तिक भेट घेऊन या मदतीचा उपयोग शालेय शिक्षणाच्या कार्यासाठी करावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली.
याप्रसंगी श्री सतीश करंजकर यांनी मुळशी भागातील सर्व कंपन्यांना आवाहन केले आहे की अशा कठीण प्रसंगी आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून वेळप्रसंगी आपण त्यांच्या मदतीला धावून जाणे हे मोठा भाऊ म्हणूनआपले कर्तव्य आहे. तसेच या संकटग्रस्त भागातील तरुणांना आपल्या भागातील कंपन्यांमधून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन या सामाजिक उपक्रमांमध्ये हातभार लावावा. यासंदर्भात कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन लागल्यास मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधावा.
