सर्व कंत्राटी व मानधनावरील कामगारांना पगार स्लिपा दिल्या जात नाही - हनुमंत लांडगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १५ हजाराहून अधिक कामगार हे कंत्राटी व मानधन तत्वावर काम करीत आहेत. सदर कामगारांना दरमहा पगार स्लिपा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना बँकांकडुन शैक्षणिक, गृह, वैद्यकीय व इतर कारणांसाठी कर्ज, सीसी, ओव्हर ड्राफ्ट काढता येत नाही.

तरी कायम कामगारांप्रमाणे मनपातील सर्व कंत्राटी व मानधनावरील कामगारांना दरमहा न मागता पगार स्लिपा देणेबाबत सर्व संबधित ठेकेदारांना याबाबत आदेश निर्गत करावे, तसेच आदेशाची अमलबजावणी झाल्याशिवाय ठेकेदारांची दरमहा देयके अदा करणेत येऊ नयेत अशी मागणी निवेदनाद्वारे हनुमंत लांडगे (महासचिव, भाजपा, महाराष्ट्र कामगार सेल) यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकडे केली आहे.