मुंबई : कामगारांच्या समस्या योग्य संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातूनच सुटू शकतात, त्यामुळे कामगार आणि व्यवस्थापनाने यापुढेही नियमित संवादातून समन्वयाने समस्या सोडविण्याचे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
विधानभवनात एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, चिंचवड येथील कामगारांच्या तक्रारींबाबत बैठक (दि. २५) झाली. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच कामगारांचे हक्क सुरक्षित राहतील याकडे व्यवस्थापनाने कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश दिले.
कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.