मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीची नवीन नियुक्त सदस्यांची प्रथम बैठक मुंबई येथे संपन्न झाले.सदर बैठक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री गणेश ताठे यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळ सचिव श्री अक्षय तुरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आलेली असून त्यामध्ये मालक प्रतिनिधी,कामगार प्रतिनिधी व स्वतंत्र प्रतिनिधी अशा 15 प्रतिनिधींची नेमणूक पुढील तीन वर्षासाठी करण्यात आलेले असून त्या समितीची पहिली बैठक कामगार भवन बांद्रा या ठिकाणी संपन्न झाली बैठकीत उपस्थित सर्व प्रतिनिधी व अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले बैठकीत किमान वेतन कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून ज्या 24 शेड्युल उद्योगांच्या किमान वेतन अधिसूचना काढण्यात आलेले आहेत त्याबाबत सविस्तर चर्चा सर्व प्रतिनिधीनी केली,तसेच ज्या 42 उद्योगांचा किमान वेतनाचा मसुदा शासनाकडे सादर केला आहे त्या मसुद्यावर सर्व सदस्यांबरोबर पुन्हा एकदा चर्चा होऊन त्यांचे किमान वेतन निर्धारण त्वरीत करण्यात यावे अशी प्रकारची चर्चा सदरच्या बैठकीत करण्यात आली.
सदर 42 उद्योगापैकी ज्या उद्योगात मोठ्या संख्येने कामगार शोषित पीडित आहेत अशा दहा उद्योगांचे तातडीने किमान वेतन पुनर्निर्धारण करण्यात यावे व त्याबाबतचा मसुदा शासनाकडे पाठवावा असे या बैठकीत ठरवण्यात आले, तसेच दर महिन्यातून एकदा सदर सल्लागार समितीची बैठक घेण्यात यावी व ज्या उद्योगाचे किमान वेतन प्रलंबित आहेत त्या किमान वेतनाची तातडीने पुनर्रचना व्हावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
कायद्यानुसार दर पाच वर्षांनी प्रत्येक उद्योगाची किमान वेतन बदलले पाहिजे असा नियम असतानाही गेल्या अनेक वर्षात अनेक उद्योगांची किमान वेतन पुर्नरचना निर्धारण झालेले नाही याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त करून त्वरित व तातडीने किमान वेतनाच्या पुर्ननिर्धारण करावे असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.
बैठकीत कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब भुजबळ पुणे,संजय जोरले संभाजीनगर,माणिक पाटील खामगाव, एडवोकेट गणेश देशमुख नवी मुंबई तर मालक प्रतिनिधी म्हणून श्री बाबासाहेब दरेकर पुणे, श्री संतोष देशमुख खामगाव तर स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून श्री वीरेंद्र ठाकूर मुंबई, श्री सुबोध रवींद्र देऊळगावकर नागपूर, व श्री बिपिन नगीनदास गांधी खामगाव अकोला इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.
किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री गणेश ताठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.बैठकीत झालेल्या विषयाचा आढावा श्री ताठे यांनी त्याच्या समारोपाच्य भाषणात घेतला. बैठकीत उपस्थित सर्व सदस्याचे आभारप्रदर्शन कामगार नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले पुढील बैठक नवरात्र नंतर घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात येऊन बैठक संपन्न झाली.