महाराष्ट्र राज्य कामगार विभागांतर्गत कार्यरत एन एम लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमार्फत एचआर / ईआर परिषद 2025 चे पुण्यात प्रथमच आयोजन

पुणे : महाराष्ट्र राज्य कामगार विभागांतर्गत कार्यरत एन एम लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमार्फत पुण्यामध्ये प्रथमच दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी यशदा, बाणेर, पुणे येथे एच आर / ई आर परिषद आणि संस्थेच्या 2024-26 तुकडीच्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली.

    या कार्यक्रमासाठी एच आर आय आर क्षेत्रातील अनेक गणमान्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती रोशनी कदम- पाटील उपसचिव (कामगार) आणि संचालक एमआयएलएस यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुप्रिया बडवे - कार्यकारी संचालक - बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड, उपस्थित होत्या. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून श्री. महेंद्र पाटील - संचालक एचआर व्हर्लपूल इंडिया, श्री. धैर्यशील देसाई - व्यवस्थापकीय संचालक मेगा- कॉर्पसोल, श्री. संजय देशपांडे - जीएम एचआर किर्लोस्कर फेरस, आणि श्री. विश्राम देशपांडे - संचालक प्रकल्प यशदा होते तर श्री. सुधीर श्रीवास्तव - एचआर प्रमुख ह्युंदाई मोटर्स, पुणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले.

    सदर कार्यक्रम हा  MHCM & ER (मास्टर ऑफ ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई रिलेशन्स) या स्पेशलायझेशनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रवासाची औपचारिक सुरुवात आहे. कार्यक्रमा ची सुरुवात श्रीमती रोशनी कदम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, त्यानंतर श्री. पी.एम. कडूकर यांनी संस्थेची आणि अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि व्याप्ती यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय पाहुणे यांनी त्यांचे मते इंडस्ट्री आणि अकॅडमिक यांच्या अनुषंगाने व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर आणि भविष्यातील प्रवासाबद्दल मार्गदर्शन करताना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

एच आर / ई आर परिषद 2025

    या कार्यक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या एच आर / ई आर परिषदेमध्ये पुणे जिल्ह्यातील एच आर / ई आर क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अनेक मान्यवर उपस्थित होत. 

    परिषदेमध्ये श्री. विश्राम देशपांडे - संचालक प्रकल्प यशदा, माजी अप्पर कामगार आयुक्त  व श्री. उदय खरात - प्रमुख एचआर बॉश चेसिस सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे आणि प्रख्यात लेखक श्री. सतीश घोगरे - माजी प्रमुख ईआर महिंद्रा ग्रुप, श्री. शिंदे सुधीर - सहसंचालक डिश व श्री. रमन गोवित्रीकर - प्रमुख एचआर मुबिया ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे तर महिला प्रतिनिधी म्हणून प्रख्यात या चार तज्ञ श्रीमती. अनु सेठी - संचालक FEV इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपस्थित होत्या. 

    परिषदेमधील वक्त्यांनी एच आर / ई आर च्या विविध दृष्टिकोनावर, मूल्यांवर आणि नेतृत्व विकास व लोक व्यवस्थापन यावर आपली मते आणि अनुभव सांगताना धोरणात्मक निर्णय घेण्याच्या कौशल्या सोबतच प्रभावशाली सुसंवाद साधण्याच्या हातोटी बद्दल आग्रहाने मते मांडली. तसेच सर्व व्यक्तींनी भविष्यातील एचआर व्यावसायिकांना घडवण्याच्या वचनबद्धतेची हमी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. 

     कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित एनआयपीएम राष्ट्रीय अधिकाऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला. श्री. अभय खुरसाळे - राष्ट्रीय समिती सदस्य एनआयपीएम व श्री. नरेंद्र पाटील - प्रादेशिक उपाध्यक्ष, पश्चिम विभाग एनआयपीएम तसेच श्रीमती अनु सेठी - संचालक FEV इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना २०२५ चा सर्वोत्कृष्ट महिला एचआर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.