पिरंगुट : एमआयडीसी येथील लिओनी वायरिंग सिस्टीम (पुणे) प्रा. लि. (Leoni Wiring System Pune Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय मजदूर संघ BMS ( महाराष्ट्रात राज्य औद्योगिक कामगार महासंघ ) संलग्न लिओनी वायरिंग सिस्टीम एम्प्लॉईज युनियन कामगार संघटना यांच्यामध्ये ऐतिहासिक तिसरा वेतनवाढ करार दि. 07 ऑगस्ट 2025 रोजी मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला असून कराची वैशिष्ट्ये खालील प्रमाण आहेत.
कराराचा कालावधी :-
दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2026 (तीन वर्षे)
पहिल्या वर्षी - रु.6400/-
सर्वांना समान पगार वाढ
वेतनातील फरक :- जानेवारी 2024 पासुन मिळणार
रात्रपाळी भत्ता :- प्रतिदिन रु.40/-
मेडिक्लेम बेनिफिट्स : - रु.250000/-
GPA इन्शुरन्स :- रु.400000/-
GTL इन्शुरन्स :- रु.1000000/-
आउटस्टेशन अलाउन्स :- रु.500/- प्रतिदिन
रु.300/- पूर्ण महिना उपस्थित असल्यास
रु.500/- पूर्ण तीन महिने उपस्थित असल्यास
रु.19000/- (2024- 2025)
रु.20000/- (2025- 2026)
रु.21000/- (2026- 2027)
रु.20000/- दहा वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना मार्च 2026 च्या पगारामध्ये मिळणार.
हा करार यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर रवी भारसस्कर, एच आर प्रमुख विश्वजीत घोष, ज्योती कदम, सचिन खरात, प्लांट हेड वैशाली मॅडम तसेच युनियन तर्फे भारतीय मजदूर संघाचे चंद्रकांत अण्णा धुमाळ आणि भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघाचे सेक्रेटरी सुधाकर पाटील यांचे आणि त्यांचे सहकारी मित्र बाजीराव सर आणि संगमेश सर हे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून स्थानिक युनियनचे अध्यक्ष नितीन आबासाहेब मोहिते, उपाध्यक्ष प्रीती भरत कदम, महेंद्र शांताराम पाटील, सेक्रेटरी विनोद उत्तमराव मद्रेवार, जॉईंट सेक्रेटरी सिमरन रवींद्र वाटवानी, सत्वशीला प्रकाश मोरे, खजिनदार सुहास पोपट भोसले आणि सर्व युनियन सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा करार यशस्वी करण्यासाठी सर्व युनियन सभासदांनी दाखवलेला संयम आणि सहकार्य युनियन कमिटी वरील विश्वास यामुळेच हा करार यशस्वी झाला.