पुणे : बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी ग्रावर अँड वाईल (इंडिया) लिमिटेड धानोरे पुणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे तालुका खेड,पुणे या शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या अंतर्गत 40 संगणक चा अद्ययावत संगणक कक्ष, एशियन पेंट्स लि. धानोरे यांचे कडून संगणक कक्ष फर्निचर व सुयोग इंजिनिअरिंग धानोरे यांच्यावतीने संपूर्ण लँन वायरींग करून मिळाले आहे.
अशा या अद्ययावत डॉ.विजय भटकर संगणक कक्ष चा उदघाटन समारंभ श्री रोहित मोर डायरेक्टर ग्रावर अँड वाईल (इंडिया) लि.यांचे शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी श्री रंजीत घोरपडे व्हाईस प्रेसिडेंट एशियन पेंन्ट्स लि. धानोरे, श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ सरव्यवस्थापक ग्रावर अँड वाईल ( इंडिया) लि. धानोरे, श्री राजाराम वाबळे प्रो.प्रा.सुयोग इंजिनिअरिंग , श्री हृषीकेश गिरमे एच आर मॅनेजर एशियन पेंट्स लि., श्री अविनाश सुकळकर सिनिअर मॅनेजर एशियन पेंट्स, सौ सुनिताताई गावडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरे, श्री पांडुरंग गावडे एशियन पेंट्स कामगार युनियन, श्री ईश्वर गायकवाड, श्री गजानन शेळके, श्री विठ्ठल बाबर, श्री निरंजन नायक व कोमल खलाटे यांचेसह अनेक मान्यवर शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रावर अँड वाईल (इंडिया) लि धानोरे यांच्यातर्फे 600 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, पाणीबोटल व शैक्षणिक साहित्य असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.मिळालेल्या संगणक लॅब चा उपयोग आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या वाढीसाठी व तांत्रिक अत्याधुनिक कौशल्य विकसित करण्यासाठी करावा असे आवाहन श्री रोहित मोर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना केले, श्री राजेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी कंपनी करत असलेल्या कामाची माहिती उपस्थित पाहुण्यांना दिली तसेच कौशल्य विकास शिक्षणाचे महत्व विशद करून परिसरात शासनाचे मदतीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग आव्हाड यांनी केले तर पाहुण्यांचे आभार श्री मुकुंद गावडे यांनी मानले आणि संगणक कक्षाच्या उद्घाटनाचा छोटेखानी सोहळा आनंदात पार पडला.