भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली व भव्य कामगार मेळावा

पुणे : देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    या दिवशी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये होणाऱ्या भव्य राष्ट्रीय मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनराव भागवत व केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुखभाई मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन होणार आहे.

   BMS चे केंद्रीय पदाधिकारी आणि देशभरातून हजारो कामगार प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरात या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता एस.पी. कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

   या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांचे मार्गदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी अर्जुन चव्हाण, अध्यक्ष – BMS पुणे, तर जिल्हा सचिव सागर पवार हे मागील वर्षातील कामाचा आढावा सादर करणार आहेत.

   या कार्यक्रमाआधी संध्याकाळी 4:30 वा शनिवारवाडा ते एस.पी. कॉलेज दरम्यान  मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बँक, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, वीज, परिवहन, मेट्रोतील कामगार, अंगणवाडी, घरेलू, बांधकाम, महानगरपालिका व खासगी हॉस्पिटलमधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

   यावेळी भारतीय मजदूर संघाच्या पुणे शाखेतर्फे सर्व सभासदांना आपल्या घरावर BMS चा झेंडा लावण्याचे आवाहन ,भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण व सचिव सागर पवार यांनी केले आहे , जेणेकरून कामगार संघटनात्मक एकतेचे दर्शन घडेल अशी माहीती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.