महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे फेसबुक पेज फाॅलो करण्याची पद्धत

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ आहे. याची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF – महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) दर ६ महिन्यातून (जून व डिसेंबर) मंडळाला मिळते. 

     या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात याची माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे फेसबुक पेज फाॅलो करा त्याची खालील पद्धत -

१) खालील लिंक क्लिक करा

https://www.facebook.com/share/1Azc9tA5Yi/

२) ही लिंक ओपन झाली की निळ्या रंगाच्या अक्षरांमधील Follow या शब्दावर क्लिक करा.

३) Follow या शब्दावर क्लिक केल्यावर तो शब्द Following असा बदलला आहे याची खात्री करावी.